वंचित बहुजन आघाडी तर्फे पवईत भिम जयंती उत्साहात साजरी
- Powai News
- May 5
- 1 min read
मुंबई पवई
प्रतिनिधी प्रतिक कांबळे
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि थोर महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी पवईतील जनता नेहमी पुढाकार घेते त्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी वार्ड १२२ तर्फे पवईत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सिनेमा ग्राऊंड येथे ०४ एप्रिल रोजी संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक १२२ तर्फे एकच राजा भिमराव माझा या बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात महामानवाचे विचार गीतातून सादर करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व टिमचे मोठे योगदान लाभले आहे.वार्ड अध्यक्ष विशाल खंडागळे यांनी आमच्या सोबत बोलताना सांगितले की विभागात महामानवाचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहु.