top of page

खड्डेमुक्त झालाय ना महाराष्ट्र

  • Writer: Powai News
    Powai News
  • Sep 6
  • 1 min read

आनंद झालाय आज मला

महाराष्ट्रात खड्डे दिसत नाही

खड्डेमुक्त झालाय महाराष्ट्र तरी

जनता हसताना दिसत नाही


ओ साहेब.......

खरच ओ आता महाराष्ट्रात

कुठेच खड्डे नाही....

कुठेच अपघात नाही....

कुठेच पाणी साचले नाही....

कोणी पाण्यात वाहून गेले नाही....

खरच साहेब सलाम तुमच्या कार्याला

आणि नुसताच बघत बसतोय ओ

तुमच्या आश्वासनाच्या भोवऱ्याला

गरागरा फुरतोय आश्वासनाचा भोवरा

रस्त्यावर खड्डा नसताना ही

बायकोला गमावून बसलाय तो नवरा


आता भिती नाही पावसाची येऊ द्या कितीही

कारण महाराष्ट्र खड्डेमुक्त झालाय.....

कुठेही खड्डे पडत नाही...

रस्त्याला तडे जात नाही.....

आणि मुख्य म्हणजे

कमरे इतके पाणी कुठेच साचत नाही म्हणून

मी आता दोन-तीन दिवस अंघोळ करत नाही

अंघोळीच राहू द्या बाजूला मी तसाच राहील

तुमच्या कार्यामुळे जनतेला हसताना पाहिल


मनापासून धन्यवाद साहेब तुम्हाला

आपला महाराष्ट्र खड्डेमुक्त केलाय

जनतेला पावसाळी भेट म्हणून

आश्वासनाचा फिरता भोवरा दिलाय


Some Newspaper Cuttings & Media Reports on Potholes.

Pothole claims yet another life in Powai
ree

ree
bottom of page