top of page

आयुष्य फाउंडेशन यांच्या वतीने पवईत स्वतंत्र दिनानिमित्त भव्य रक्तदान संपन्न

  • Writer: Powai News
    Powai News
  • Aug 11
  • 1 min read

Updated: 13 hours ago

पवई


भारतीय स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वतंत्र लढ्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना म्हणून नेहमी प्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही पवईत आयुष्य फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.

ree

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान बघायला गेलात तर रक्ताचा पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बऱ्याचदा संघटनेच्या वतीने किंवा राजकीय पक्षांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.त्याचप्रमाणे बघायला गेले तर समाजसेवेसाठी अग्रेसर असलेली पवईतील तरुणांची संघटना आयुष्य फाऊंडेशन यांच्या वतीने यंदा हि सालाबादप्रमाणे रविवार दि १० ऑगस्ट २०२५ रोजी विश्वशांती बुद्ध विहार पवई येथे रक्तदान उस्फुर्त प्रतिसादाने संपन्न झाले.


आयुष्य फाऊंडेशन यांना रक्त पेढी म्हणून बाळासाहेब ठाकरे ट्रोमा सेंटर यांची रक्तपेढी लाभली सकाळी ९ ते सायं ६ वाजेपर्यंत पवई तील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी भेट देऊन आपल्या रक्तदानाचा अधिकार बजावला यावेळी एकुण १६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ree

आयुष्य फाउंडेशनच्या पदाधिकारी यांच्या सोबत बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही दरवर्षी अशाप्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतो आणि गरजूंना वेळोवेळी मदतीचा हात देत असतो हे कार्य आमचे सतत सुरू राहणार आहे.

bottom of page