पवईतील गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी
- Powai News

- Aug 24
- 1 min read
मुंबई पवई
गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला म्हटलं की गोविंदांचा सण थरावर थर रचत एकमेकांना सावरत हंडीचा शोध घेत ती हंडी फोडण्यासाठी चाललेली धावपळ प्रत्येक गोविंदा मध्ये दिसून येते.प्रत्येक विभागात प्रत्येक ठिकाणी गोविंदा आनंद लुटतात परंतु त्यात कधी असं घडतं की काही जखमी होतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो.
पवईतील २१ वर्षीय तरुण आनंद दांडगे हा गोपाळकालाच्या दिवशी विक्रोळी कन्नमवार नगर येथे दहीहंडी फोडण्यासाठी संघासोबत गेला असता पाचव्या थरावरून पडून आनंद हा जखमी झाला होता त्या विक्रोळी टागोर नगर येथे सुश्रिषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु २३ ऑगस्ट रोजी आनंद दांडगे यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.
आनंद दांडगे हा परिवारात आई वडील असून मुलांच्या निधनानंतर त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे.गेल्या वर्षी त्यांच्या लहान मुलांचे देखील निधन झाले होते आई वडिलांचा आनंद आधार होता त्याचे देखील निधन झाल्याने परिवार खचून गेला आहे.






